एका इंजिनियरिंग बॅचच्या शेवटाची सुरुवात…!

मी शंतनू मोरे. इ.आर शंतनू मोरे. आता तुम्ही म्हणाल ही इ.आर काय भानगड आहे. तर मुळात ती भानगड नसून डी.आर ची नक्कल आहे. डॉक्टर लोक्स स्वतःच्या नावाआधी डी.आर लावतात, हे जगजाहीरच आहे. मग आम्ही इंजिनीयर लोक्सही त्यांच्यापेक्षा काही कमी नाही आहोत, हे दाखवायचा एक बारकुला प्रयत्न म्हणजे नावाआधी इ.आर लावणं. असो, ही गहन चर्चा थोडी…

सोशल मिडियाटिकपणाची ‘गुऱ्हाळं’

नुकतीच स्मार्टफोनची गॅलरी चाळत होतो. हे घबाड हातास लागलं आणि गॅलरीतले स्क्रीनशॉट्स पाहून स्वतःचंच हसू आलं.त्या त्या वेळी आपल्या या डोक्यात जे काही चालू असतं, ते आपण लिहीत असतो. पोस्ट केल्यावर रिप्लाय येतात. मग त्याला परतीची उत्तरंही ओघानं आलीच म्हणायची. यालाच आपण गुऱ्हाळ म्हणूया. ही अशी कोट्यावधी गुऱ्हाळं व्हॉट्सऍप युनिव्हर्सिटीत किंबहुना एकूणच सोशल मीडिया नावाच्या…

पॉडकास्टची दुनिया !

ऋता आणि सुजय हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र. बाजूच्याच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात तृतीय वर्ष संगणक विज्ञान शाखेत शिकतात. ऋता म्हणजे सर्जनशीलतेची खाणच जणू! तिच्याकडील नवनवीन संकल्पना ऐकून काही मित्रांना तिचं कौतुक वाटतं, तर काहींना हेवा. ती सतत कसल्यातरी खटापटीत गुंतलेली असते. सुजयही नेहमी त्याच्याच धुंदीत असतो. त्याला पुस्तकं वाचायला जाम आवडतात. कथा कादंबऱ्यांपेक्षा वैचारिक वाचनावर…

नळदुर्ग: एक अविस्मरणीय भेट

दिनांक 9 मार्च 2019. एका मित्राच्या बहिणीच्या लग्नासाठी आम्ही एकूण सतरा वर्गमित्र औरंगाबादेहून उस्मानाबादेत थडकलो होतो. दुपारी साडेबाराचं लग्न साधारण दीड वाजता आटोपलं. पंगती उठल्यानंतर थोड्या गप्पागोष्टी झाल्या; तोवर तीन वाजायला आले होते. मग एका मित्राने पुडी सोडली. त्याच्या पुडीतला तो बेत बाहेर आला. काय होता तो बेत(?) तर नळदुर्गला जाऊया. मी मराठवाड्याचाच असलो तरी…