आपल्याला नेमकं काय हवंय?

हा आहे केंद्र सरकारचा निर्भया फंड. राज्यांनी तो महिला सुरक्षेसाठी वापरावा यासाठी केंद्र भरघोस आर्थिक मदत करतं. असं असताना देशपातळीवर त्यातील केवळ 20% रक्कम प्रत्यक्षात वापरली जाते. या पैशाचा पूर्ण क्षमतेने उपयोग करण्याची मुभा असूनही तो तसा केला जात नाही (दुर्दैवाने महाराष्ट्र याबाबत अव्वल आहे). धोरण अंमलबजावणीतील अनेकांगी दोषांचं हे एक प्रातिनिधिक उदाहरणच जणू! असो,…

‘वास्तुपुरुषा’शी भवताल रिलेट करताना ●::●

अभ्यास, आहार आणि आराम असं तीन ‘आ’कारी आयुष्य जगत भविष्याची हस्तलिखितं लिहिणं सुरू आहे हल्ली. त्यात थोडासा फेरबदल म्हणून मग युट्युबवर एखादा आशयघन चित्रपट पाहण्यात येतो रविवारी. मागच्या ब्लॉगमध्ये ग्रामीण शिक्षणव्यवस्थेतील दोषांना भेदून एक रचनात्मक परडाईम शिफ्ट घडवून आणणाऱ्या ‘उबुंटू’ या चित्रपटाबद्दल लिहिण्यात आलेलं. त्यालाही आता जवळपास पंधराएक दिवस होऊन गेले. मध्ये एक रविवारही अस्मादिकांच्या…

‘उबुंटू’च्या शोधात..!

‘उबुंटू’ हा दक्षिण आफ्रिकेत बोलल्या जाणाऱ्या झुलू भाषेतला शब्द. ‘मी आहे कारण आपण सारे आहोत’ असा या शब्दाचा मराठीत मान्यता पावलेला अर्थ. तसं पाहिलं तर मला हा शब्द यापूर्वी माहीत असण्याचं काहीच कारण नव्हतं. परंतु २०१७ साली जेव्हा या शीर्षकासोबतचा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा उत्सुकता म्हणून मी त्याचं ट्रेलर पाहिलेलं. ते पाहताक्षणीच लक्षात आलं…

एका इंजिनियरिंग बॅचच्या शेवटाची सुरुवात…!

मी शंतनू मोरे. इ.आर शंतनू मोरे. आता तुम्ही म्हणाल ही इ.आर काय भानगड आहे. तर मुळात ती भानगड नसून डी.आर ची नक्कल आहे. डॉक्टर लोक्स स्वतःच्या नावाआधी डी.आर लावतात, हे जगजाहीरच आहे. मग आम्ही इंजिनीयर लोक्सही त्यांच्यापेक्षा काही कमी नाही आहोत, हे दाखवायचा एक बारकुला प्रयत्न म्हणजे नावाआधी इ.आर लावणं. असो, ही गहन चर्चा थोडी…

सोशल मिडियाटिकपणाची ‘गुऱ्हाळं’

नुकतीच स्मार्टफोनची गॅलरी चाळत होतो. हे घबाड हातास लागलं आणि गॅलरीतले स्क्रीनशॉट्स पाहून स्वतःचंच हसू आलं.त्या त्या वेळी आपल्या या डोक्यात जे काही चालू असतं, ते आपण लिहीत असतो. पोस्ट केल्यावर रिप्लाय येतात. मग त्याला परतीची उत्तरंही ओघानं आलीच म्हणायची. यालाच आपण गुऱ्हाळ म्हणूया. ही अशी कोट्यावधी गुऱ्हाळं व्हॉट्सऍप युनिव्हर्सिटीत किंबहुना एकूणच सोशल मीडिया नावाच्या…