काळाच्या दोन बांधांमधली ‘नांगरणी’ ●°°●

तसं पहायला गेलं तर नांगरणीवर लिहावं अशी परिस्थिती सध्या नाही. चहुबाजूंनी संकटाच्या कुंभगर्त्यात सापडलेल्या शेती नावाच्या व्यवसायाचं भीषण रूप आज आपल्याला आपल्याच आभासी जाणिवांपुढे कफल्लक वाटतं. म्हणूनच, त्यावर लिहायला जावं तर कदाचित सैरभैर होण्याचीच शक्यता अधिक. अशावेळी मग लेखनथांबा घेऊन उघड्या डोळ्यांनी ‘भवताल’ वाचत राहणं केव्हाही संयुक्तिक असतं. असा वाचनप्रपंच सुरु असताना कधीकधी नवीन धागे…

माझा वाचनप्रवास: जागतिक पुस्तकदिनानिमित्त…!

इसवी सनाच्या 21 व्या शतकाचं तिसरं साल असेल कदाचित. मी बालवाडी सोडून गावातीलच जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत दाखल झालेलो. फार काही कळण्याचं वय नव्हतंच मुळात. तरीही तिसरीच्या वर्गात गेल्यावर क्रमिक पुस्तकं आणि त्यांचा सहवास आवडायला लागलेला. त्यातून बऱ्याच वेळा परत परत एकच पुस्तक वाचायचा कंटाळा येत असे. त्यावर उपाय म्हणून मग दैनिक सकाळचं अगदीच गाजलेलं…