थेट पर्यावरणाच्या दरबारातून…!

लहान असताना गावच्याच दुकानातून किरकोळ किराणा सामान आणायला जाण्यात एक वेगळीच मजा असायची. तेव्हा दैनंदिन सामानवजा वस्तू रद्दी पेपरात भरून वितरित केल्या जात असत. गोडतेलासाठीसुद्धा घरूनच स्टीलची कॅन सोबत न्यावी लागत असे. प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर अगदीच जुजबी म्हणावा असा…निव्वळ गरजेपुरता! पॅकेजिंग केलेल्या वस्तू अत्यंत तोकड्या प्रमाणात दाखल होऊ लागलेल्या. मात्र दिवस बदलत गेले. बदलणाऱ्या दिवसांगणिक…

एसटी आणि बरंच काही..!

संकेतस्थळावर ब्लॉग लिहून आज बरेच दिवस झाले. मध्यंतरीचे दोन रविवार सुटले. ‘विशीतल्या तरुणाईची गोष्ट’ या ब्लॉगसीरिजचे जेमतेम तीन ब्लॉग्ज लिहून झाले तोपावेतो परीक्षा संपून कॉलेजला कायमच्या सुट्ट्याही लागलेल्या. नंतर लिहिणं झालं नाही. सबब दर रविवारी ब्लॉग प्रसिद्ध करण्याचा पायंडा/स्टेटस को मोडीत निघाला. हे असं कामात चुकार होणं, चुकीचंच आहे. आपण एखाद्या गोष्टीचा व्यासंग जोपासायचं ठरवलं…

विशीतल्या तरुणाईची गोष्ट: भाग ३

‘विशीतल्या तरुणाईची गोष्ट’ या ब्लॉगसीरिजमधला हा तिसरा ब्लॉग. ब्लॉग म्हणजे ‘वेब-लॉग’ या मूळ शब्दाचा अपभ्रंश. आज या वेब-लॉगिंगच्या माध्यमातून जगभरातील अनेक लोक विविध विषयांवर व्यक्त होत असतात. मुळात ‘क्रिएटिव्ह वेब कंटेंट’ ही संकल्पना नव्या जगाची परिभाषाच बनून बसली आहे. हे सगळं इतकं वेगात घडत असताना प्रिंट मीडियाही या बदलाला अपवाद राहिलेला नाही. असो. दहा वर्षांपूर्वी…

विशीतल्या तरुणाईची गोष्ट: भाग २

ग्रामीण भागातील भलेमोठे चिरेबंदी वाडे म्हणजे विसाव्या शतकातल्या जमीनदारीची प्रतीकंच. अशा वाड्यांमध्ये जेव्हा टेलिफोन अँटेनाज उभे राहू लागले तेव्हा भारताच्या ग्रामीण समाज जीवनात पुन्हा एकदा बदल होऊ घातलेला होता. मात्र असं असलं तरी, नेहमीप्रमाणं या बदलातही अगदी ठळकपणे जाणवणारी सूक्ष्म दरी होतीच. थोडक्यात काय तर ठराविक लोकांच्याच घरी अशा प्रकारची सोय उपलब्ध झालेली. त्या वेळी…

विशीतल्या तरुणाईची गोष्ट: भाग 1

विसाव्या शतकात प्रकट झालेल्या कैक पिढ्यांतील शेंडेफळ म्हणजे नव्वदच्या दशकात अवतरलेली आमची ‘पोस्ट खा.उ.जा’ पिढी. आता हा खाउजा काय नवीनच प्रकार(?) असं त्या व्हॉट्सऍप इमोजीसारखं तोंड करून तुमच्यापैकी बव्हंशी लोक्स विचारतील, याची मला पूर्वकल्पना आहेच. परंतु त्यातील बरेच जण गूगल करून तिचा माग लावतील, अशी लिटरभर खात्रीदेखील आहे. असो. तर ही ‘पोस्ट खाउजा’ पिढी आता…