लेणी, लेणापूर आणि ती जाहिरात..!

मागे एकदा इंजिनियरिंगला असताना अजिंठा लेणी पहायला गेलो होतो. तब्बल निम्मं तप औरंगाबादेत राहूनही तू अजिंठा लेण्या पाहिल्या नाहीस, असं म्हणत कोणी आपल्याला वेड्यात काढू नये म्हणून अचानकच प्लॅन बनवलेला. सोबतीला चार पाच सवंगडी होते. मध्यवर्ती बसस्थानकातून एसटी पकडून लवकरच अजिंठा गाठला. तिकीट वगैरे काढून लेण्यांच्या दिशेने निघालो. अवतीभवतीच्या परिसरात झालेली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट पाहिल्यावर औरंगाबादच्या…

ट्रॅव्हलर, मालवणी डेज आणि आम्ही सारे: भाग 4

दुपारचे अडीच वाजलेले. एकीकडे डोकं तापवणारं रखरखतं ऊन तर दुसरीकडे पाय भाजून सोडणारी मऊशार कोकणी रेती. एकूणच काय तर प्रचंड सुतकी वातावरण. अश्या परिस्थितीत समोर जर अथांग जलसागर दिसला तर कुणाही सर्वसाधारण माणसाचं जे होईल तेच आमच्या गँगचंही झालं. तारकर्ली बीच बहुतेक लोक्स पहिल्यांदाच समुद्र पाहत होते. त्या बहतेकांत मीही आलोच म्हणा! एरवी कोरड्या नद्या…

ट्रॅव्हलर, मालवणी डेज आणि आम्ही सारे: भाग 3

किनारा रिसॉर्टसमोर आमची ट्रॅव्हलर व्हॅन थांबली तोच मगाचपासनं गाणी ओकत सुटलेला साऊंड एकदाचा सायलेंट झाला होता. त्याचं आपलं बरंय. स्विच टाकलं की वाजायला लागतो. मग इकडे गाणं कुठलंही आणि कोणीही गायलेलं असो, याला त्याचं काही सोयरंसुतक राहत नाही. या साऊंडसारख्या कैक वस्तूंकडे पाहिल्यावर त्यांच्या निर्जीवपणाचा हेवा वाटायला लागतो. निदान ही निर्जीव पामरं इतरांशी भेदभाव तरी…

ट्रॅव्हलर, मालवणी डेज आणि आम्ही सारे: भाग 2

दि. 12/04/2019 थोड्या वेळापूर्वी गगनबावडा घाट उतरल्यावर गाडी थांबली तेव्हा एका हॉटेलात चहा बिस्कीटं खाऊन झालेली. तीही तोंड न धुता! बेडटी म्हणजे एक भन्नाट प्रकार असतो. सकाळच्या प्रसन्न वातावरणात ब्रश न करता चहा घेण्यात जी मजा आहे, ती अगदीच युनिक म्हणावी लागेल. असो, तर मगाशी चहा पिताना त्या हॉटेलसमोरील रस्त्यापलीकडे एक पडकी जुनी इमारत दिसलेली….

ट्रॅव्हलर, मालवणी डेज आणि आम्ही सारे: भाग 1

जिप्सी सोल असणाऱ्या तरुणतुर्काला भटकंतीसाठी कारणं लागत नाहीत. मूड झाला की कधी एकदा या शहरी कोलाहलातून बाहेर पडतोय, असं व्हायला होतं. शिवाय इकडे इंजिनियरिंगचाही केवळ एक महिना बाकी. त्यात अलरेडी ग्रुपमध्ये कुजबुज सुरू झालेली. एव्हाना कुजबुजेचं रूपांतर चर्चेत कधी झालं, कळलंसुद्धा नाही. विषय काय(?) तर ग्रुप टूरला गेलं पाहिजे. झालं! कोकणात मालवणला जायचं ठरलं. तीन…

नळदुर्ग: एक अविस्मरणीय भेट

दिनांक 9 मार्च 2019. एका मित्राच्या बहिणीच्या लग्नासाठी आम्ही एकूण सतरा वर्गमित्र औरंगाबादेहून उस्मानाबादेत थडकलो होतो. दुपारी साडेबाराचं लग्न साधारण दीड वाजता आटोपलं. पंगती उठल्यानंतर थोड्या गप्पागोष्टी झाल्या; तोवर तीन वाजायला आले होते. मग एका मित्राने पुडी सोडली. त्याच्या पुडीतला तो बेत बाहेर आला. काय होता तो बेत(?) तर नळदुर्गला जाऊया. मी मराठवाड्याचाच असलो तरी…