आपल्याला नेमकं काय हवंय?

हा आहे केंद्र सरकारचा निर्भया फंड. राज्यांनी तो महिला सुरक्षेसाठी वापरावा यासाठी केंद्र भरघोस आर्थिक मदत करतं. असं असताना देशपातळीवर त्यातील केवळ 20% रक्कम प्रत्यक्षात वापरली जाते. या पैशाचा पूर्ण क्षमतेने उपयोग करण्याची मुभा असूनही तो तसा केला जात नाही (दुर्दैवाने महाराष्ट्र याबाबत अव्वल आहे). धोरण अंमलबजावणीतील अनेकांगी दोषांचं हे एक प्रातिनिधिक उदाहरणच जणू!

असो, तर मी वर वानगीदाखल दिलेल्या उदाहरणांसारख्या अन्य तत्सम उदाहरणांची गोळाबेरीज केली की, व्यवस्था विस्कटायला सुरुवात होते. परिणामी गुन्हे घडतात. त्यावर आपण टोकाच्या प्रतिक्रिया देतो. जात धर्माची जळमटं चढवतो. मानसिक हिंसेचं समर्थन करतो. कोणी विवेकी भूमिका घेतलीच तर त्याला ‘देशद्रोही’, ‘लिब्टार्ड’ म्हणून शिवीही हासडतो. प्रश्न चेपले जातात. शेवटी हा सगळा आभासी गदारोळ पाहून व्यवस्थेलासुद्धा चेव येतो. तिलाही कीड लागते. लागलेल्या किडीच्या समर्थनार्थ मध्ययुगीन संदर्भ दिले जातात. हुर्यो केला जातो. व्यवस्थेत असणाऱ्या पक्षनिरपेक्ष सत्ताधाऱ्यांना ही कीड हवीच असते; अनिर्बंध सत्ता गाजवायला. इकडे आपल्या दोन दिवसांच्या गदारोळानंतर मूळ समस्या बाजूलाच पडते. दुर्घटना मात्र घडतच राहतात. अन्यायाचं दुष्टचक्र सुरूच राहतं. अशावेळी थोडा मूलगामी, खोलवर विचार करायला हरकत असू नये. खरंतर जनतेनं याबद्दल लोकप्रतिनिधींना जाबच विचारायला हवा. उदा. न्यायव्यवस्थेतील रिक्तता भरून काढणं, वगैरे. परंतु सध्याच्या ट्रोलधाडप्रणित आततायी वातावरणात हे काम तसं अवघडच म्हणावं लागेल. शिवाय हे सगळं घडवण्यासाठी आपल्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या मेणबत्ती मार्च आणि ट्रोलप्रणीत हॅशटॅग कॅम्पेन्सचा त्याग कोण करणार, हाही प्रश्न आहेच! सरतेशेवटी हे कुठंतरी थांबलं पाहिजे. आपल्यातला हा तालिबानी रानटीपणा वारला पाहिजे. थोडंसं मुद्द्याला भिडायला शिकलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला नेमकं काय हवंय, हे कळायला आणि मागताही यायला पाहिजे.

कारण व्यवस्थेचा भक्कमपणा आणि ‘कायद्याचं राज्य’ ही संकल्पनाच आपला ‘उद्या’ उन्नत करणारंय, हे नक्की.

:-।

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.