एसटी आणि बरंच काही..!

संकेतस्थळावर ब्लॉग लिहून आज बरेच दिवस झाले. मध्यंतरीचे दोन रविवार सुटले. ‘विशीतल्या तरुणाईची गोष्ट’ या ब्लॉगसीरिजचे जेमतेम तीन ब्लॉग्ज लिहून झाले तोपावेतो परीक्षा संपून कॉलेजला कायमच्या सुट्ट्याही लागलेल्या. नंतर लिहिणं झालं नाही. सबब दर रविवारी ब्लॉग प्रसिद्ध करण्याचा पायंडा/स्टेटस को मोडीत निघाला. हे असं कामात चुकार होणं, चुकीचंच आहे. आपण एखाद्या गोष्टीचा व्यासंग जोपासायचं ठरवलं तर त्यातील सातत्य जपणं, हे ओघाने आलंच. परंतु प्रत्येक गोष्टीला जगात अपवाद असतात. तसे ते सातत्यालाही अधूनमधून असायला हवेत. असं केल्याने आपण करत असलेल्या कामात येणारं साचलेपण आपसूकच बाजूला सारलं जातं, असं माझं प्रामाणिक मत आहे. असो.

आजपासून जवळजवळ 11-12 वर्षांपूर्वी तालुक्याच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतल्यावर जी गोष्ट अगदी दररोज करावी लागणार होती; ती म्हणजे पांगरी-धारूर आणि धारूर-पांगरी असा प्रवास. अंतर विचाराल तर फारसं नव्हतंच मुळात. सांगायचंच झालं तर सात किलोमीटर असेल जेमतेम. आता शाळेत जायचं म्हटलं तर सकाळी दहाची एसटी बस पकडणं गरजेचंच असायचं तेव्हा. पंधरा मिनिटांचंच अंतर परंतु अंबाजोगाईहून धारूरला निघालेली बस गावच्या बस स्टॉपवर बरेचदा उशिरा यायची. सबब खेड्यातून तालुक्याला येणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत पोचायला बहुदा उशीरच होत असे. आम्हा शाळकऱ्यांचं असं वेळ सोडून उशिरा शाळेत दाखल होणं, हा एसटीच्या अनागोंदी कारभाराचाच इम्पॅक्ट होता, जणू.

असं असलं तरी शालेय आयुष्यातील पाचवी ते नववी अशी पाचेक वर्षं एसटीच्या नियमित प्रवासाने समृद्ध झालेली. मुळात एसटी म्हणजे चाकरमान्यांपासून शेतमजूरापर्यंतच्या ग्रामीण/निमशहरी लोकांची जीवनवाहिनी. एसटी बसने नियमित प्रवास करणाऱ्या पब्लिकमध्ये प्रामुख्याने शिक्षक, बँक कर्मचारी, सरकारी कारकून आणि शालेय विद्यार्थी यांचा समावेश असे; तसा तो आजही असतोच, म्हणा.

इकडे शाळा साधारणतः चार वाजता सूटत असे. परत गावी जाण्यासाठी बस स्टँडवर गेल्यावर तिथे असलेली गर्दी पाहून थिजल्यासारखं व्हायला होई. वाट पाहून अर्धा पाऊण तास झाल्यावर धारूर-अंबाजोगाई बस लागत असे. फार कमी वेळा बसगाड्या वेळेवर लागत. परिणामी उशिराने निघणाऱ्या बसला तुफान गर्दी होई. प्रवासादरम्यान सानथोर मंडळी अक्षरशः गर्भगळीत होऊन जात. या सगळ्या थबडग्यात ज्याची सर्वात जास्त पंचाईत होई; ती व्यक्ती म्हणजे कंडक्टर असे. एका हातात तिकिटांनी खच्चून भरलेली पेटी तर दुसऱ्या हातात तिकीट पंचर सांभाळत आपलं तिकीट वाटपाचं काम करणाऱ्या या माणसाची मला बरेचदा कीव यायची.
ड्रायव्हरचीही तीच गत. बसगाडीची टेक्निकली इतकी वाट लागलेली असतानाही हा माणूस तिचं विनातक्रार सारथ्य कसं काय करू शकतो, याचं त्यावेळी अप्रूप वाटत असे.

एसटीच्या असुविधेबद्दल बरंच काही लिहिता येईल.
मात्र असं असलं तरी ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी निम्म्या दरात पासची सोय उपलब्ध करून देऊन एसटीने आजवर जी सामाजिक बांधिलकी निभावली आहे, तिला आम्हा ग्रामीण विद्यार्थ्यांच्या लेखी तोड नाही. म्हणूनच तर एसटीच्या 71 व्या वर्धापनदिनी आज तिच्याबद्दल मनात कृतज्ञतेची भावना दाटून आली आहे.

येत्या काळात एसटीच्या कारभारात बरेच चांगले बदल झालेले दिसतील, अशी आशा बाळगताना तिच्या पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!

2 Comments Add yours

 1. Jitendra Zirpe says:

  खूप छान लिहितोस तू , असच ठेव करण छंद जोपासणे खूप अवघड झालाय बघ या आजचा आपल्या वयात . तुझे शब्दातली तन्मयता आणि समृद्धी तुझा लेख वाचताना आपलेसे करून जाते , खूप कमी लोकांना जमत हे त्यातला तू आहेस . मला तुझे असे लेख वाचायला खूप आवडतील . तुझ्या पुढच्या वाटचालीस शुभेच्छा .
  तुझाच मित्र ,
  जितेंद्र झिरपे

  Like

  1. Khoop khoop dhanyawad 😊

   Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.