विशीतल्या तरुणाईची गोष्ट: भाग ३

‘विशीतल्या तरुणाईची गोष्ट’ या ब्लॉगसीरिजमधला हा तिसरा ब्लॉग. ब्लॉग म्हणजे ‘वेब-लॉग’ या मूळ शब्दाचा अपभ्रंश. आज या वेब-लॉगिंगच्या माध्यमातून जगभरातील अनेक लोक विविध विषयांवर व्यक्त होत असतात. मुळात ‘क्रिएटिव्ह वेब कंटेंट’ ही संकल्पना नव्या जगाची परिभाषाच बनून बसली आहे. हे सगळं इतकं वेगात घडत असताना प्रिंट मीडियाही या बदलाला अपवाद राहिलेला नाही.
असो.
दहा वर्षांपूर्वी आमची पिढी शाळेत शिक्षण घेत होती; तेव्हा गावात वर्तमानपत्र यायला दररोज दहा वाजलेले असायचे. अर्थातच हे काम तालुक्याच्या ठिकाणी दूध विकायला जाणाऱ्या एखाद्या शेतकरी काकाकडे सोपवलं जायचं. तालुक्याहून पेपर आणण्याचं काम तो व्हॉलंटीयर वर्क म्हणून करत असावा, बहुदा. या सगळ्या प्रकारामुळे शाळा सुटल्यावर वर्तमानपत्र वाचायला मिळत असे. थोडक्यात काय तर काल जगात काय घडून गेलं, हे कळायला दुसऱ्या दिवशी शाळा सुटण्याची वाट बघावी लागे. तुम्ही म्हणता तसं टीव्हीचा सोर्सही होताच सोबतीला. परंतु ग्रामीण भागाचा विचार करता त्या माध्यमाला त्यावेळी स्वतःच्या काही मर्यादा होत्या. डिटीएच अजून घराघरात पोचायचं बाकी होतं. मराठीत बरीचशी न्युज चॅनल्स यायची बाकी होती. आणि अशाच भानगडींमुळे गावात न्युजपेपरला अधिक महत्त्व असायचं. शिवाय वर्तमानपत्र वाचत वाचत राजकीय गप्पांचे फड रंगवणं, हा इथल्या निम्न-मध्यमवर्गीयांचा स्वातंत्र्यपूर्वकाळापासूनचा जुना छंद. हे सगळं अगदी बेमालूमपणे घडत असताना आयुष्याची पेसही त्या मानाने अगदीच कमी असायची. परंतु आज या विषयाकडे वळून पहायला गेलं तर अकाट्य बदल झालेला दिसतो.
आता हेच पहा ना! काही एक वर्षांपूर्वी आम्ही वर्तमानपत्रासाठी पूर्णपणे पेपर एजन्सीजवर अवलंबून असायचो. त्यासाठी दुसरा कुठलाही पर्याय समोर नसायचा. आज डिजिटल एजमध्ये मात्र पेपर एजन्सी ही ओल्ड फॅशन होऊ घातली आहे. विशीतल्या तरुणाईचं विचाराल तर बव्हंशी लोक्स आपल्या स्मार्टफोनवरच न्युजपेपर वाचतात. इ-बुक रिडींगचं प्रमाण कुणी कितीही नाकारलं तरी दिवसेंदिवस वाढत आहे. यावरून येणाऱ्या काळात आणि वर्तमानातही वेब कंटेंटला मिळू घातलेलं महत्व आपसूकच लक्षात येतं.
वेब कंटेंट हा जसा पुस्तकं, वर्तमानपत्रं आणि वेब साईट डेटाच्या संदर्भात अस्तित्वात आहे; तसाच तो ऑडियो-व्हिज्युअल माध्यमांतही मोठी भूमिका बजावतो आहे. आज पॉडकास्ट, युट्युब व्लॉगिंग, वेब सिरीज, स्टोरीटेल, फ्री-वेबजर्नालिझम सारख्या माध्यमांनी डिजिटल स्पेसवर जो धुमाकूळ घातला आहे, तो पॅराडाईम शिफ्ट ठरावा इतका परिणामकारक आहे. या बदलाने आर्ट-लँग्वेज-जर्नालिझम-इकॉनॉमीला नवे आयाम घालून दिले आहेत, असं जर मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
हे सगळं इतकं अविश्वसनीय वाटत असताना दहा वर्षांपूर्वी ऑडिओ-व्हिज्युअलचं आपल्या आयुष्यातील स्थान काय होतं, याचा विचार केला तर स्मार्टफोन आणि इंटरनेटचं महत्त्व आपल्या लक्षात येतं. टीव्ही आणि रेडिओ याच्या पलीकडे काही असू शकेल असा विचारही त्यावेळी अनेकांच्या गावी नव्हता. परंतु स्मार्टफोनमुळे लोकांना इंटरनेट वापरण्याचं भान आलं. तर युट्युबमुळे व्हिडीओ माध्यमाचा स्पेस वाढला. बदलांचं हे लोण इतक्यात न थांबता आता पॉडकास्ट या ऑडिओ माध्यमापर्यंत येऊन पोचलं आहे. सरतेशेवटी या सगळ्या थबडग्यातून खेड्यापाडयापर्यंत पोचलेला डिजिटल कनेक्ट आज वेब कंटेंटला अचानक आलेल्या महत्त्वाचं एक प्रमुख कारण बनला आहे.

अशा प्रकारे नव्या जगाच्या या नवीन परिभाषेत आपल्या पिढीच्या बऱ्याच समस्यांची उत्तरं दडली आहेत. ती शोधली तर सापडतील, हे मात्र नक्की.

क्रमशः

2 Comments Add yours

  1. Varad Jaybhaye says:

    Very nyc

    Like

    1. Thank you so much…Keep reading!☺️

      Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.